Tuesday, 4 September 2018
तू
Date: Aug 23, 2018
तू
भेटलास तू, बोललस तू
हसलास तू, फसलास तू
मनात माझ्या ठसलास तू
हृदयात आता वसलास तू......!!
स्वप्नात तू, भासात तू
श्वासात तू, प्राणात तू
जीवन माझे झालास तू
आंनदास आता बहर तू......!!
हसवलेस तू, फसवलेस तू
रंगात तू, ढंगात तू
जीवन माझे बदलेस तू
दुःखास आता हरवलेस तू......!!
तलाक तू, निकाह तू
आगीत तू, दाहात तू
आयुष्य माझे मोडलेस तू
अधुरेच आता सोडलेस तू... .!!
दुःखात तू, अश्रूत तू
श्वासात तू, ध्यासात तू
देहाच्या माझ्या वणवा तू
वेदनेचे आता ग्रहण तू..........!!
©® सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
---
Shared using https://www.writediary.com/getapp
Subscribe to:
Posts (Atom)