काल (अलिव ) अलिवाची खीर बनवतांना तुमच्या बरोबर यांचे फायदे शेयर करावे वाटले...
मला पुर्वी या बदल माहिती नव्हती पण डिलिव्हरी मध्ये याची खीर आई बनवून देत असे तीही काहीच दिवस ....
अलिव गरम असतात म्हणून जास्त प्रमाणात सेवन केले जात नाही ......
तसा अलिवाची खीर विषेश थंडी मध्ये तीन दिवस सेवन केली जाते तीही सूर्य उदयाला यायच्या अगोदर ...वर्षभर होणारी कंबर दुखी यांच्या तिन दिवसाच्या सेवनाने होत नाही अनुभवाने सांगते आहे ....तीन सिझर नंतर ही ...
मराठी चंद्रशूर किंवा आलिव( हलीम) हिंदी नाव
अलिव बियाचे काही :::::::::: फायदे
अलिव पोषणमूल्यांनी भरलेल्या असून पारंपरिक मराठी पदार्थांमध्ये अलिव (चंद्रशूर) खीर किंवा लाडू खूप लोकप्रिय आहेत.
बियामध्ये लोह (आयरन) भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवून अशक्तपणा (ऍनिमिया) दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
बियामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांध्यांच्या वेदनांपासून आराम मिळतो.
प्रथिने आणि उष्मांक (कॅलोरी) जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
व्हिटॅमिन सी भरपुर असते
अलिवच्या बिया स्तनपान करणाऱ्या मातांसाठी खूप फायदेशीर आहेत, कारण त्या दूध वाढवतात तुम्ही घेतल्या असतील बाळंतपणात ..
अलिवच्या बिया दूधात भिजवून खीर बनवता येते.
गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अलिव बियांचा वापर करावा.
अतिसेवन केल्यास पचनास त्रास होऊ शकतो....
अलिव बिया पौष्टिक आणि औषधी गुणांनी भरलेल्या असल्यामुळे त्या आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा. हिवाळयात ....तर नक्कीच
मी वर्षातुन तीन दिवसच खिर घेते फायदेशीर आहे खुपच ....
®© सुरजकुमारीSuraj Kumari Goswami
(तुम्ही अलिव कशा प्रकारे वापता तेही सांगा
#अलिव
#चंद्रशूर
#हलीम
#हिवाळा
#पौष्टिकआहार
#मराठीपरंपरा
#घरगुतीउपाय
#आरोग्य
#प्रथिनयुक्त
#हाडांसाठीउपयुक्त
#आईंचाविश्वास
#सांधेदुखी
#हिवाळ्याचाखासपदार्थ
#सौंदर्य
#स्तनपान