Wednesday, 13 September 2017

चांदण्याला भार झाले

चांदण्याला भार झाले .. चांदण्यांना भार झाले सावल्यांचे आज आहे रोखते मी अश्रु सारे वेदनांचे आज आहे हातहाती घेवुनी होतास कावा साधला तू शोधले मी फार आता ते पुरावे आज आहे गोठले रे अश्रु माझे तू मनाशी खेळताना आठवांनी न्हाहते मी का दुरावे आज आहे शेवटाचे स्वप्न माझे एकदाचा तू दिसावा देह जळताना सख्या रे शांत चीता आज आहे जीवघेणा खेळ पुन्हा तोच का खेळायचा रे? ठरवले मनसोक्त जगणे धुंद जीवन आज आहे. ...........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment