Date: Apr 22, 2018
जरा दुःख होता रडावे कशाला
जराश्या सुखाने हसावे कशाला
मिळालेच स्वात्यंत्र नव्हते कधीही
अता पंख मिळता उडावे कशाला
जगावे स्वतःच्याच मस्तीत आता
उगा मी सुखा डावलावे कशाला
लिहीली नशीबी कुणी ही गरीबी
दुवा मागता आखडावे कशाला
इथे लाभते अत्तरांची सलामी
सुगंधी फुला चुरगळावे कशाला
©® *सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद*
---
Shared using https://www.writediary.com/getapp