Sunday, 22 April 2018

पहिली गझल

Date: Apr 22, 2018 जरा दुःख होता रडावे कशाला जराश्या सुखाने हसावे कशाला मिळालेच स्वात्यंत्र नव्हते कधीही अता पंख मिळता उडावे कशाला जगावे स्वतःच्याच मस्तीत आता उगा मी सुखा डावलावे कशाला लिहीली नशीबी कुणी ही गरीबी दुवा मागता आखडावे कशाला इथे लाभते अत्तरांची सलामी सुगंधी फुला चुरगळावे कशाला ©® *सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद* --- Shared using https://www.writediary.com/getapp

No comments:

Post a Comment