Saturday, 29 December 2018

आता

Date: Dec 29, 2018 आता सोबतीला दोस्त नाही खास आता श्वास घेता वाटतो का फास आता पाहताना देखणी काया शराबी वाटतो डोळ्यांस माझ्या त्रास आता टाळले त्यांनी मला ही कैक वेळा टाळण्याचा मीच घेते ध्यास आता दर्शनाची रांग मोठी पाहताना जाहलो मी पायरीचा दास आता दुःख माझ्या दावणीला बांधलेले स्वप्न उरले की सुखाचा भास आता ....... ©® .सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद --- Shared using https://www.writediary.com/getapp

No comments:

Post a Comment