Saturday, 1 August 2020

परके

*उतरले एकदा* *मनांतून* 
*की माणूस ते* 
*आठवीत नाही*.
*हाताचे वार मिटती* 
*एकवार, पण*
*शब्दांचे मार विसरत नाही* 
*नाही जमले बोलायला,गोड*
 *दोन शब्द जरी*, 
*शस्त्रवार नको शब्दांचे*,...
  *गोड पेरा साखरेसम*  *ते*...
*नका होवू कधि* 
*बोलुनि कटू, आणि* 
*आपले आपल्याशीच परके*.......

........©® *सुरजकुमारी गोस्वामी* *हैद्राबाद*

Friday, 31 July 2020

दोन ओळी

.माझ्या शब्दाशब्दांत 
तुझा उल्लेख ..
चाललाय वाढत 
शब्दांचाच आलेख

 ......©®सुरजकुमारी 

Thursday, 30 July 2020

बहर फुलावा


         बहर फुलावा
वाढत आहे अंतर अपुल्या दोघांमध्ये
इतका का रे? असे दुरावा दोघांमध्ये

थोडे थोडे चल दोघेही चालुन पाहू
उजळू दे ना नवा कवडसा दोघांमध्ये

स्पंदन व्हावे तुझे नी माझे एकच आता
तालावरती धडधड वाढे दोघांमध्ये

संध्याकाळी नयनामध्ये तुझी आठवण
एक सुखाचा क्षण साठावा दोघांमध्ये

किती घेतल्या आणाभाका होत्या आपण
हीच शिदोरी उरली आता दोघांमध्ये

झाले गेले विसरुन जाऊ आपण दोघे
पुन्हा एकदा बहर फुलावा दोघांमध्ये

...©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद

Monday, 27 July 2020

नाती कविता ..

*नाती*


काहि नाती असतात 

खोलवर जखमा देणारी 

वरवर शांत वाटली तरी 

हृदयात वणवा पेटवणारी


जपावी लागतात तरी 

आपल्याला ती स्वतःच्या 

बांधीलकीत राहून 

समुद्रासारखे विशाल होऊन


नसेल लायकी त्यांची

त्याप्रमाणे पण आपणच 

राहवे लागते पायरी पाहून

काही नाती सांभाळताना 

जळावे लागते सुत होऊन 


........©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद

Monday, 6 April 2020

भेट वाटते आहे अंत नक्कीच हिच शेवटची भेट आपली नाही पुन्हा जीवनाचे गणित असे का ? बोलत आहे मी तर पाहा बंद दारातून डोकावून पाहतोस मुत्यूला तुला बोलवतोय तो तू हसत जातोस शरण त्यास शरणागती पत्कारत आहे तू येथे स्वस्त झाले आहे मरण करत आहे तू स्वतः वाचे हरन पाहा बाहेर पडत आहे मढ्याचे खचच्या खच हाजारो खांदेकरी हि नाहीत चार पाहा कल्पनाकरून फक्त थैमान घातले मुत्यूने ताडंव चालू आहे मुत्यूचे तुझ्या हातात तुझे जीवन तुझ्या हातात तुझे मरन नाही येथें मरणा-यास सरन पाहा बाहेर उभे आहे मरन ..........©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद ...