नाती कविता ..
*नाती*
काहि नाती असतात
खोलवर जखमा देणारी
वरवर शांत वाटली तरी
हृदयात वणवा पेटवणारी
जपावी लागतात तरी
आपल्याला ती स्वतःच्या
बांधीलकीत राहून
समुद्रासारखे विशाल होऊन
नसेल लायकी त्यांची
त्याप्रमाणे पण आपणच
राहवे लागते पायरी पाहून
काही नाती सांभाळताना
जळावे लागते सुत होऊन
........©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
No comments:
Post a Comment