.माझ्या शब्दाशब्दांत
तुझा उल्लेख ..
चाललाय वाढत
शब्दांचाच आलेख
......©®सुरजकुमारी
बहर फुलावा
वाढत आहे अंतर अपुल्या दोघांमध्ये
इतका का रे? असे दुरावा दोघांमध्ये
थोडे थोडे चल दोघेही चालुन पाहू
उजळू दे ना नवा कवडसा दोघांमध्ये
स्पंदन व्हावे तुझे नी माझे एकच आता
तालावरती धडधड वाढे दोघांमध्ये
संध्याकाळी नयनामध्ये तुझी आठवण
एक सुखाचा क्षण साठावा दोघांमध्ये
किती घेतल्या आणाभाका होत्या आपण
हीच शिदोरी उरली आता दोघांमध्ये
झाले गेले विसरुन जाऊ आपण दोघे
पुन्हा एकदा बहर फुलावा दोघांमध्ये
...©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद