Tuesday, 6 June 2017
झाडे लावा
*झाडे लाव*
तुझ्या असणा-या
सुखनैव चैनीपाई
तुला लागणा-या
छानछौकी घरा-रस्त्यापाई
राजरोस
*माणसा कसा रे करतोस*......
*तू कत्तल झाडांची*
आपल्या चटावलेल्या
सुखसोईंसाठी
स्वःताच्या सिमेंटच्या
जंगलासाठी...
निर्ठावल्या मनाने
*माणसा कसा रे करतोस*......
*तू कत्तल झाडांची*...
किती होतोय हा
ह्रास वनसंपत्तीचा...
श्वास कोंडतोय रे माझा
शुद्ध हवेसाठी
दररोज...
*माणसा कसा रे करतोस*......
*तू कत्तल झाडांची*...
देवाचे देणे हे निसर्गाचे
झाडा वनांचे वृक्षवल्लीचे
जपायचा हा खजिना
पुढील पिढीसाठी
तरी पण..
*माणसा कसा रे करतोस*......
*तू कत्तल झाडांची*...
कधीतरी जागे होता
विश्व वन्य दिवसासाठी
एका दिवसाचा दिखावा
अन् स्वःताच्या सेल्फीसाठी
त्या आधी मात्र
*माणसा कसा रे करतोस*......
*तू कत्तल झाडांची*...
सण साजरे होताच तू
पुन्हा मोकळा तू
झाडांच्या कत्तलीसाठी
सिमेंटच्या जंगलासाठी
पुन्हा पुन्हा
*माणसा कसा रे करतोस*......
*तू कत्तल झाडांची*...
हो जागा मानवा परत
चल घेऊ वसा एकत्र
झाडे लावू, झाडे जगवू
तुझ्यासाठी, माझ्यासाठी
पशूपक्ष्यांसाठी आणि
आपल्या मुलाबाळांसाठी
लाव एकतरी झाड
*माणसा नको रे करूस*......
*तू कत्तल झाडांची*...
...........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment