Tuesday, 8 August 2017

भेटलास तू

भेटलास तू, बोललस तू हसलास तू, फसलास तू मनात माझ्या ठसलास तू हृदयात आता वसलास तू......!! स्वप्नात तू, भासात तू श्वासात तू, प्राणात तू जीवन माझे झालास तू आंनदास आता बहर तू......!! हसवलेस तू, फसवलेस तू रंगात तू, ढंगात तू जीवन माझे बदलेस तू दुःखास आता हरवलेस तू......!! तलाक तू, निकाह तू आगीत तू, दाहात तू आयुष्य माझे मोडलेस तू अधुरेच आता सोडलेस तू... .!! दुःखात तू, अश्रूत तू श्वासात तू, ध्यासात तू देहाच्या माझ्या वणवा तू वेदनेचे आता ग्रहण तू..........!! सुरजकुमारी गोस्वामी, हैद्राबाद .. Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment