Friday, 1 June 2018

Date: Jun 1, 2018 स्वप्न माझे स्वप्न माझे ........ तसे लहानसेच आहे मिळावा 'ती' ला सम्मान हेच एक धेय्य आहे.. अंकुरावे बीज, कळी ती खुलावी सुगंधी घरदार.... तीच्या वावराने व्हावी पण लागलीय खंत गर्भात होतो तीचा अंत *स्वप्न माझे* .... *तसे लहानसेच आहे*... मुलांप्रमाणे तीचा सुद्धा हक्क आहे.... नसे अवहेलना.. नसे ससे होलपट... मुलगी म्हणून जगताना सर्वत्र मिळो तीला मान.. शिकून सवरून... खूप नाव तीचे व्हावे.. *स्वप्न माझे* .... *तसे लहानसेच आहे*... उत्तुंग भरारी सवे तीच्या आभाळ कवेत आहे... चला घेऊया शपथ चला करूया निर्धार.. भयमुक्त निर्भया.... करू भारतभर... देहांताचे फक्त शासन असावे व्यभिचा-यास.. *स्वप्न माझे* .... *तसे लहानसेच आहे*... समाजाची सा-या आता नजर शालीन आहे. सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद --- Shared using https://www.writediary.com/getapp

No comments:

Post a Comment