Sunday, 29 July 2018

स्वप्ने

Date: Jul 29, 2018 स्वप्ने तुझी असावी डोळ्यास आस माझ्या तो भास धुंद करतो वेड्या मनास माझ्या झाले तुझीच मी रे विसरून ह्या जगाला आहे तुझेच सारे आवरु कसे मनाला गंधाळल्या दिशा ह्या, भुलवी जिवास माझ्या बेबंद आज वारा झोंबे तनास माझ्या जडला विकार आहे आता तुझाच मजला आरक्त गाल माझे मदमस्त रंग सजला आकंठ मी बुडाले, थरथर जलास माझ्या बिंबास लाज वाटे की आरश्यास माझ्या? आकांत कोरडा हा अश्रू अबोल होते पण सुन्न काळजाचे रडणे जहाल होते झाला अधीर ओठा, तू चुंबण्यास माझ्या अलवार सारले तू मधल्या करास माझ्या हा खेळ सावल्यांचा दिसतो भकास आहे असणे तुझे अताशा नुसताच भास आहे झालास केंद्रबिंदू ह्या वर्तुळास माझ्या पुर्णत्व लाभले रे आहे जिवास माझ्या .....सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद --- Shared using https://www.writediary.com/getapp

Saturday, 21 July 2018

Date: Jul 21, 2018 दिसतोस तू धुक्यांतून त्यातल्या कवडश्यातून जाग सकलां आणितो स्वप्ने नवी तू आणितो उल्हासहर्ष चोहीकडे प्रसन्न सुरवात भिनवे जीवन उजळे तुझ्यामुळे तू नसता अंधार मिळे... अमरभुपाळी तुझ्याच साठी कूक आरवे तुझ्याच भेटी... येतोस तू पहाटकाली सरे भेट मग सायंकाली.... कोण सांगा कळलं का ते रत्नाकर सुर्य नाम तयाचे. .....©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद --- Shared using https://www.writediary.com/getapp

Thursday, 12 July 2018

माझी

Date: Jul 12, 2018 हृदयात ऊठलेला हा भाव नविन आहे. मन मंदिरातला हा संवाद नविन आहे. पहिलाच स्पर्श देई मज वेगळीच गोडी वेड्या मनात आता हा भास नविन आहे भेटायचे सख्याला मी कोणत्या किनारी मी चालते अताशा जी वाट नविन आहे बेभान धुंद झाले, ह्या वेगळ्या नशेने जगण्यास घेतलेला मी ध्यास नविन आहे श्वासास रोखले मी, त्याच्या मिठीत शिरता गालावरी गुलाबी ही लाज नविन आहे ...©®.सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद --- Shared using https://www.writediary.com/getapp

माझी गझल

Date: Jul 11, 2018 गागाल गागाल गागालगा भासात श्वासात असतोस तू हृदयात माझ्याच वसतोस तू येऊन जातोस स्वप्नांत अन् छेडून स्वप्नात हसतोस तू हृदयास हरवून घेतोस पण परतून प्रेमात फसतोस तू मनसोक्त देतोस वाटा तुझा कुठल्याच यादीत नसतोस तू जमले जुने आठवांचे थवे अलवार हृदयात ठसतोस तू ©®सुरजकुमारी गीस्वामी हैद्राबाद --- Shared using https://www.writediary.com/getapp