Sunday, 29 July 2018

स्वप्ने

Date: Jul 29, 2018 स्वप्ने तुझी असावी डोळ्यास आस माझ्या तो भास धुंद करतो वेड्या मनास माझ्या झाले तुझीच मी रे विसरून ह्या जगाला आहे तुझेच सारे आवरु कसे मनाला गंधाळल्या दिशा ह्या, भुलवी जिवास माझ्या बेबंद आज वारा झोंबे तनास माझ्या जडला विकार आहे आता तुझाच मजला आरक्त गाल माझे मदमस्त रंग सजला आकंठ मी बुडाले, थरथर जलास माझ्या बिंबास लाज वाटे की आरश्यास माझ्या? आकांत कोरडा हा अश्रू अबोल होते पण सुन्न काळजाचे रडणे जहाल होते झाला अधीर ओठा, तू चुंबण्यास माझ्या अलवार सारले तू मधल्या करास माझ्या हा खेळ सावल्यांचा दिसतो भकास आहे असणे तुझे अताशा नुसताच भास आहे झालास केंद्रबिंदू ह्या वर्तुळास माझ्या पुर्णत्व लाभले रे आहे जिवास माझ्या .....सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद --- Shared using https://www.writediary.com/getapp

No comments:

Post a Comment