Date: Jul 11, 2018
गागाल गागाल गागालगा
भासात श्वासात असतोस तू
हृदयात माझ्याच वसतोस तू
येऊन जातोस स्वप्नांत अन्
छेडून स्वप्नात हसतोस तू
हृदयास हरवून घेतोस पण
परतून प्रेमात फसतोस तू
मनसोक्त देतोस वाटा तुझा
कुठल्याच यादीत नसतोस तू
जमले जुने आठवांचे थवे
अलवार हृदयात ठसतोस तू
©®सुरजकुमारी गीस्वामी हैद्राबाद
---
Shared using https://www.writediary.com/getapp
No comments:
Post a Comment