Friday, 5 September 2025

प्रसाद

पुलिहोर्‍याची आठवण (प्रसाद)

लग्न होऊन हैदराबादला गेले तेव्हा पहिल्यांदा मंदिरात प्रसाद म्हणून मला एक आंबटसर भात मिळाला. चवीला इतका अप्रतिम की जिभेवरून सरकतानाच मनात कायमचा साठून राहिला! नाव काय विचारलं तर जाऊबाई हसत म्हणाल्या, “फुलहोरा”. 😄
मला नीट उच्चारता आलं नाही, आणि आजही मी त्याला मजेत “फूलगोरा” असंच म्हणते!

माझ्यासाठी चिंच ही नेहमीच आवडीची. म्हणून हा पदार्थ पाहता क्षणीच मनाला भावला. जाऊबाईच्या हातचा पुलिहोरा म्हणजे खरोखरच चविष्ट — त्यांचा हातखंडा पदार्थ! 

कधीही मी घरी तो करण्याचा प्रयत्न केला तर तसा जमायचाच नाही. पण काल मधल्या (ऋशाली ने) लेकीनं प्रसादासाठी दोन किलो पुलिहोरा केला आणि बघता बघता देवळात मिळतो तसा प्रसादच तयार झाला! चवीला एकदम अप्रतिम ..
तुम्हाला मी रेसिपी देत आहे...

 पुलिहोरा (इमलीभात) रेसिपी

साहित्य :

🌾 तांदूळ – १ कप
🌿 चिंच – लहान लिंबाएवढी गोळी
🌶️ हिरवी मिरची – ४-५  उभ्या(चिरलेल्या)
🍃 कढीपत्ता – ८-१० पाने
✨ हळद – ½ टीस्पून
🧂 मीठ – चवीनुसार

फोडणीसाठी:
🥄 तेल – २ टेबलस्पून
🌱 मोहरी – १ टीस्पून
🌱 उडीद डाळ – १ टीस्पून
🌱 चणा डाळ – १ टीस्पून
🌶️ सुकी लाल मिरची – २ तुकडे
🥜 शेंगदाणे/काजू – २ टेबलस्पून
🌸 हिंग – चिमूटभर
🍯 गूळ – चवीनुसार

कृती 

 तांदूळ शिजवून थंड करून घ्या (दाणे सुटे राहतील असे).

 चिंच पाण्यात भिजवून घट्ट रस काढा.

कढईत तेल गरम करून मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ, शेंगदाणे/काजू, सुकी मिरची, हिंग व कढीपत्ता परता.

 त्यात हिरवी मिरची, चिंचेचा रस आणि गूळ घालून उकळी आणा.

 त्यात हळद, मीठ टाका आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

 हे मिश्रण शिजवलेल्या भातावर टाकून छान मिसळा.

✨ लिंबाचा रस घालून लिंबूपुलिहोराही बनवता येतो.
✨ प्रसादासाठी कांदा-लसूण टाळतात 
✨ भक्तिभावाने केलेला पुलिहोरा चवीला नेहमीच स्वर्गीय लागतो!

एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा — तुमच्या पुलिहोर्‍याला मंदिराच्या प्रसादासारखी चव आली का? 💛

.........®© Suraj Kumari Goswami 

#पुलिहोरा #इमलीभात #देवाचा_प्रसाद #TempleFood #TraditionalTaste #SouthIndianFood #FoodMemories #मंदिरआठवणी #चिंचप्रेम #आंबटगोडचव #FoodLove #FamilyRecipes #Prasadam #FoodieLife #खमंगचव

No comments:

Post a Comment