Thursday, 11 May 2017

________कविता _______ ________कविता _______ किती धुशील वरुन देहाला ****************** किती धुशील वरुन देहाला आतुन पाप आहे.. गोमुत्र शिंपडुन कुणी शुध्द होतो कारे... चिंतेत बसुन कुणी बुध्द होतो कारे.. मारुन मांजराला किती करशील काशी झोपडीत माय तुझी माऊली उपाशी ............... घालुन माळ कुणी संत होतो कारे आंधारत करुन पाप कुणी महंत होतो कारे.. मांजर आडवी गेली म्हणून आपशकुन होते कारे... पाल अंगावर पडली म्हणून माणुस मरतो कारे... मनाचे खेळ सारे तुझ्या माणसारे. शकून अपशकुन नसते आसे काही रे... किती धुशिल देहाला वरुन आतुन पाप आहे... कावळ्याने खालला घास म्हणून तो बाप होतो कारे.... ... ................सुरजकुमारी गोस्वामी.हैद्राबाद .......... Shared with https://goo.gl/9IgP7 Shared with https://goo.gl/9IgP7 Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment