Sunday, 7 May 2017

आई

मिट्ट काळोखात नाही! तीची *निजानिज !!* अलगद गारवा! मनाला लागीतसे !! घरट्यात परतले पक्षी ! *संधिकाली !!* हंबरती गोठ्यात ! परतूनी गाई गूरे !! ताबूस सुर्य पश्चिमेस ! *झुकलेला !!* दीवसभर उपसून ! काबाड कष्ट !! बाप पहा परतला ! *विसाव्यास !!* झाली सांजरात ! कशी मोहते मनास !! माय लावते लामणदिप! *देऊळात !!* जशी जळते वात ! मंद दिव्यामध्ये !! तशी राबराबते घरात ! *आई माझी !!* पाखरे गाईवासरे ! बाप ही झोपला !! आई रात्रंदिनी उपशी !! *कामरेटा !!* आईचा हा जीव ! गुंततो सगळ्यात !! मिट्ट काळोखात नाही! *निजानिज !!* .. .........सुरजकुमारी गोस्वामी ... Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment