Friday, 14 July 2017
तुला सर्तक राहायला हवं
*तुला सतर्क राहायला हवं*
बेटा
तुला सतर्क राहायला हवं
या शैतानाच्या वस्तीत
ह्या हैवानाच्या वस्तीत
पावलोपावंली
बेटा
*तुला सतर्क रहायला हवं*
आयुष्याच्या खेळात
स्वतःला जपायला हवं
लोकांच्या घोळक्यात
आप्तांच्या कळपात
बेटा
*तुला सर्तक रहायला हवं*
होऊन स्वावलंबी तुला
अस्तित्व जपायला हंव
येथें पावला पावलांवर
असतात लांडगे
लबाड मनाचे सांडगे
तुला बळकट बनायला हवं
बेटा
*तुला सतर्क रहायला हवं*
वादळं वावटळं ही
तू परतुन लावायला हवी
आत्मविश्वास ठेवून स्वतः वर
तुला सर्तक रहायला हवं
बेटा
*तुला सतर्क रहायला हवं*
*सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment