Friday, 7 July 2017

तरी आम्ही बोलू नये

दडलेल्या शब्दांना वाचा फुटली आर्त वेदनांची ललकारी उठली मनातील भावना ही आक्रोशली बंडखोर लेखणीने केला पुकारा राजकारण्यांचा ढोंगीपणा सारा पिढ्यानपिढ्याचा केला सहारा *तरी आम्ही बालू नये.......* चढला फासावर माझा बळीराजा त्याची होती कुणाला किती चिंता तुम्हीच अधिकारी, तुम्हीच राजा तुमचीच खुर्ची अन् तुमचीत सत्ता तुमच्याच साथीला विरोधक तुम्ही तुमच्याच हातात, सारी भागीदारी *तरी आम्ही बोलू नये...........* माकडांच्या हातात सत्तेची दोरी निवडून दिली आम्हीच ही घोडी अंध कारभार नी आम्ही बघेकरी गेंड्याच्या कातड्यात बसली सारी खुर्चीच्या लोभींना नशा ही चढली लोककल्याणकारी ठरलेत कसाई *तरी आम्ही बोलू नये...........* फिरतात मोकाट आज बलात्कारी शरमेत झाकते लाज माय बिचारी आयाबहिणींचे लुटतेय शील रोज झोपलीय यंत्रणा कुठल्या पदरात चढलाय का कधी फाशी सेलिब्रेटी तुमच्यात चालतात रोजीरोटीबेटी *तरी आम्ही बोलु नये...........* कुठे कांदा पेटतो कुठे पेट्रोल पेटे दाम तुमचे अन् आमचे मात्र खेटे चेतवता आग, जात आमची पेटे तुमच्या फायद्यात घरे अमुची पेटे कागदी घोडे अन् कागदीच नाव आमची रोखूनी कामे तुमची पास *तरी आम्ही बोलू नये...........* कुठे ना कुठे वाचा फुटली पाहीजे दुमदुमणारा एल्गार झाला पाहिजे अश्रूंचाही आक्रोष झाला पाहिजे *काहीही झाले तरीसुद्धा......* पुन्हा कधी आता कोणी बोलू नये *तरी आम्ही बोलू नये...........* ⚜ *सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद ⚜ Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment