Friday, 5 September 2025

सोने खरेदीपूर्वीचे मंत्र

 सोने खरेदीपूर्वीचे उपयुक्त मंत्र (टिप्स) 


🪙 सोने खरेदीपूर्वीचे ८ मंत्र:

  1. सोने दर तपासा:
    खरेदीपूर्वी आजचा प्रतिग्रॅम/तोळा दर जाणून घ्या. दर रोज बदलतो, त्यामुळे अचूक माहिती आवश्यक आहे.

  2. शुद्धता तपासा:
    २४ कॅरेट (१००% शुद्ध), २२ कॅरेट (९१.६% शुद्ध – दागिन्यांसाठी), किंवा १८ कॅरेट (७५% शुद्ध) यातील योग्य पर्याय निवडा.

  3. हॉलमार्क पाहा:
    BIS (भारतीय मानक ब्युरो) हॉलमार्क असलेलेच सोने घ्या. हॉलमार्क म्हणजे शुद्धतेची सरकारी खात्री.

  4. मेकिंग चार्जेस लक्षात घ्या:
    दागिन्यांवर काम केल्याचे शुल्क वेगळे असते. हे ८% ते २५% पर्यंत जाऊ शकते – शक्यतो कमी मेकिंग चार्जेस असलेले निवडा.

  5. प्रमाणपत्रे पाहा:
    BIS हॉलमार्क, KDM किंवा ७५० (१८ कॅरेटसाठी) यासारखी शुद्धतेची चिन्हं तपासा.

  6. विश्वसनीय विक्रेत्याकडूनच खरेदी करा:
    ओळखीच्या, प्रसिद्ध ज्वेलर्स किंवा बँकेकडूनच खरेदी करा. स्थानिक दुकानांमध्ये खरेदी करताना विशेष काळजी घ्या.

  7. बोलाचाल करा (Negotiation):
    मेकिंग चार्जेस किंवा इतर खर्चांवर काही प्रमाणात सौदेबाजी होऊ शकते.

  8. GST आणि इतर कर समजून घ्या:
    सध्या सोन्यावर ३% GST लागू होतो. अंतिम बिल तपासूनच पैसे द्या.


.......®© सुरजकुमारी गोस्वामी हैदराबाद

💡 सल्ला:
सोनं ही केवळ दागिन्यांची खरेदी नसून एक दीर्घकालीन गुंतवणूक असते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा

प्रसाद

पुलिहोर्‍याची आठवण (प्रसाद)

लग्न होऊन हैदराबादला गेले तेव्हा पहिल्यांदा मंदिरात प्रसाद म्हणून मला एक आंबटसर भात मिळाला. चवीला इतका अप्रतिम की जिभेवरून सरकतानाच मनात कायमचा साठून राहिला! नाव काय विचारलं तर जाऊबाई हसत म्हणाल्या, “फुलहोरा”. 😄
मला नीट उच्चारता आलं नाही, आणि आजही मी त्याला मजेत “फूलगोरा” असंच म्हणते!

माझ्यासाठी चिंच ही नेहमीच आवडीची. म्हणून हा पदार्थ पाहता क्षणीच मनाला भावला. जाऊबाईच्या हातचा पुलिहोरा म्हणजे खरोखरच चविष्ट — त्यांचा हातखंडा पदार्थ! 

कधीही मी घरी तो करण्याचा प्रयत्न केला तर तसा जमायचाच नाही. पण काल मधल्या (ऋशाली ने) लेकीनं प्रसादासाठी दोन किलो पुलिहोरा केला आणि बघता बघता देवळात मिळतो तसा प्रसादच तयार झाला! चवीला एकदम अप्रतिम ..
तुम्हाला मी रेसिपी देत आहे...

 पुलिहोरा (इमलीभात) रेसिपी

साहित्य :

🌾 तांदूळ – १ कप
🌿 चिंच – लहान लिंबाएवढी गोळी
🌶️ हिरवी मिरची – ४-५  उभ्या(चिरलेल्या)
🍃 कढीपत्ता – ८-१० पाने
✨ हळद – ½ टीस्पून
🧂 मीठ – चवीनुसार

फोडणीसाठी:
🥄 तेल – २ टेबलस्पून
🌱 मोहरी – १ टीस्पून
🌱 उडीद डाळ – १ टीस्पून
🌱 चणा डाळ – १ टीस्पून
🌶️ सुकी लाल मिरची – २ तुकडे
🥜 शेंगदाणे/काजू – २ टेबलस्पून
🌸 हिंग – चिमूटभर
🍯 गूळ – चवीनुसार

कृती 

 तांदूळ शिजवून थंड करून घ्या (दाणे सुटे राहतील असे).

 चिंच पाण्यात भिजवून घट्ट रस काढा.

कढईत तेल गरम करून मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ, शेंगदाणे/काजू, सुकी मिरची, हिंग व कढीपत्ता परता.

 त्यात हिरवी मिरची, चिंचेचा रस आणि गूळ घालून उकळी आणा.

 त्यात हळद, मीठ टाका आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

 हे मिश्रण शिजवलेल्या भातावर टाकून छान मिसळा.

✨ लिंबाचा रस घालून लिंबूपुलिहोराही बनवता येतो.
✨ प्रसादासाठी कांदा-लसूण टाळतात 
✨ भक्तिभावाने केलेला पुलिहोरा चवीला नेहमीच स्वर्गीय लागतो!

एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा — तुमच्या पुलिहोर्‍याला मंदिराच्या प्रसादासारखी चव आली का? 💛

.........®© Suraj Kumari Goswami 

#पुलिहोरा #इमलीभात #देवाचा_प्रसाद #TempleFood #TraditionalTaste #SouthIndianFood #FoodMemories #मंदिरआठवणी #चिंचप्रेम #आंबटगोडचव #FoodLove #FamilyRecipes #Prasadam #FoodieLife #खमंगचव

Tuesday, 8 July 2025

"एका आईच्या मनातलं" / "आजच्या काळातलं पालकत्व



📱 तेरा-चौदा वर्षांची ‘रील’ दुनिया – पालक म्हणून आपण कुठे आहोत...?

✍️ ©® सुरजकुमारी गोस्वामी, हैद्राबाद

संध्याकाळी सहज इंस्टाग्राम स्क्रोल करत होते.
रील्स एकामागोमाग एक सुरू होत्या.
तेरा-चौदा वर्षांची मुलं-मुली — आजूबाजूला अजून दूधदुभतं चाललेलं वय — पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र ‘टुटा दिल’, ‘बेवफा सनम’, ‘तू किसी और का है’ अशी प्रौढ भावनांची झळाळी.

क्षणभर वाटलं, एवढं लवकर प्रेमात पडणं, तुटणं, सावरणं, सगळं घडून गेलंय का खरंच?

कॅप्शन बघितली तर डोळे विस्फारले –
"आपना टाईम आयेगा",
"तू नाही, तर कुणीच नाही",
"मनात फार चालतं रे..."

एक क्षण बैचेन झाले.
माझ्या छत्तिशी वयातदेखील अशी आत्ममग्न ‘फीलिंग’ वाटलेली नाही...
मग ह्या मुलांना काय झालंय?


🤳 स्मार्टफोनचा अधिकार, पण मार्गदर्शनाची अनुपस्थिती

मुलांच्या हातात स्मार्टफोन देणं आज अपरिहार्य झालंय.
ऑनलाईन शिक्षण, गेम्स, संवाद — हे सगळं हवेच.
पण त्या फोनसोबत आपण किती वेळ देतोय त्यांना?

  • आपण त्यांचं ऐकतो का?
  • त्यांचं डिजिटल वागणं समजून घेतो का?
  • त्यांचे मित्र, फॉलो केलेली अकाउंट्स, शेअर केलेले विचार – हे आपण पाहतो का?

स्मार्टफोन दिला म्हणजे पालकत्व पूर्ण झालं, असं नाही.
स्मार्टफोनसोबत स्मार्ट संवाद द्यावा लागतो.


🧠 मुलांची भावना ‘रील’ आहे, ती आपण ‘रिअल’पणे समजून घ्या

आजची पिढी फक्त वयानेच लहान आहे, पण माहितीच्या महासागरात पोहताना त्यांना आधाराची गरज आहे.

ते जे पोस्ट करत आहेत, ते त्यांच्या भावनांचं दर्शन आहे.
कधी राग, कधी हुरहूर, कधी आत्मकेंद्रितता —
हे सगळं त्यांच्या मनात चाललंय, आणि आपण बहुतेक वेळा फक्त मोबाईलवर ‘पालक नियंत्रण’ लावतो, पण मनावर कुणाचंच लक्ष नाही.


🗣️ पालक म्हणून करायच्या ५ महत्त्वाच्या गोष्टी:

  1. रोज १०-१५ मिनिटं मुलांशी संवाद साधा.
    शिकवायचं नाही – फक्त ऐकायचं.

  2. मोबाईल आणि सोशल मीडियाचे नियम ठरवा – एकत्र.
    सक्तीने नव्हे, चर्चेने.

  3. त्यांचे मित्र, आवडती गाणी, ट्रेंड्स याबाबत रुची ठेवा.
    त्यांना वाटू द्या की तुम्ही त्यांच्या दुनियेतले आहात.

  4. त्यांना प्रेमाने 'नाही' म्हणायला शिका.
    प्रत्येक हौस पूर्ण करणे म्हणजे प्रेम नाही.

  5. भावनिक गोंधळ लक्षात घ्या.
    जर मुलं सतत उदास वाटणाऱ्या गोष्टी शेअर करत असतील, तर थांबा, बसा, आणि बोला.


❤️ पालकत्व म्हणजे फक्त जबाबदारी नव्हे, ती एक सजीव नाळ आहे...

आपण अनेक वेळा म्हणतो – “आमच्या वेळी असं नव्हतं.”
हो, खरंच नव्हतं.
पण त्यावेळी जग संथ होतं, आणि आजच्या जगाची स्पीड वेगळीच आहे.

म्हणूनच पालक म्हणून आपली जबाबदारी आता जास्त आहे.
आपल्या मुलांना मोबाईलचा पासवर्ड दिला असेल,
तर त्यांच्या मनाचा पासवर्ड विसरू नका.


🙏 शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं...

मोबाईल देणं तंत्रज्ञानाचं दान आहे,
पण संवाद देणं हे माणूसपणाचं वरदान आहे.


📌 हे वाचत असलेले प्रत्येक आई-बाबा, मावशी-काका, शिक्षक, तरुण वाचक – एकदा स्वतःला प्रश्न विचाराच...

"मी त्यांच्या आयुष्यात फक्त फोन देणारा व्यक्ती आहे, की सतत उपस्थित असलेली सावली?



.....®©<सुरजकुमारी गोस्वामी हैदराबाद

Wednesday, 25 June 2025

चिया सिड्स

चिया सिड्सचे फायदे:

चिया सिड्स (Chia Seeds) हे सुपरफूड म्हणून ओळखले जातात आणि त्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. त्यांचे विविध आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे आहेत—

१. पचनतंत्र सुधारते

  • चिया सिड्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
  • पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

२. वजन कमी करण्यास मदत

  • हे सिड्स पाण्यात भिजवल्यावर जेलसारखे होतात आणि पोट भरल्याची भावना निर्माण करतात, त्यामुळे भूक कमी लागते.
  • मेटाबॉलिझम सुधारतो आणि चरबी कमी करण्यास मदत होते.

३. हृदयासाठी फायदेशीर

  • ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् भरपूर प्रमाणात असल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
  • कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

४. हाडे आणि दात मजबूत होतात

  • कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
  • ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांच्या आजारांना प्रतिबंध होतो.

५. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

  • अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि वृद्धत्व लवकर जाणवत नाही.
  • केस मजबूत आणि चमकदार होतात.

६. साखर नियंत्रणात ठेवते (डायबेटिससाठी फायदेशीर)

  • फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
  • इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि टाइप-२ डायबेटिसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

७. उर्जेचा उत्तम स्रोत

  • प्रथिने (Protein) आणि हेल्दी फॅट्स असल्‍यामुळे दिवसभर उर्जा टिकून राहते.
  • खेळाडूंना आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी हे विशेष फायदेशीर ठरतात.

८. मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर

  • ओमेगा-३ फॅटी अॅसिड्समुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते.
  • तणाव आणि नैराश्य दूर करण्यास मदत होते.

चिया सिड्स कसे खाल्ले पाहिजेत?

  • दुधात किंवा पाण्यात भिजवून
  • स्मूदी, योगर्ट किंवा ज्यूसमध्ये मिसळून
  • ओट्स किंवा सालडमध्ये टाकून
  • शेक, डिटॉक्स ड्रिंक्समध्ये वापरून

सावधगिरी:

  • प्रमाणाबाहेर सेवन केल्यास पचनाच्या तक्रारी होऊ शकतात.
  • रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चिया सिड्स नियमित आहारात समाविष्ट केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतात



......सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद

रिठा

बाजारातून रीठा घेतले काही दिवसांपूर्वी. फोडत असताना, याचे काही उपयोग तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले. लहानपणी, आई रीठा पाण्याने केस धुताना ते पाणी नाकात जाणार नाही याची खबरदारी घेत असे, कारण डोळे चुरचुरत असत. ते पाणी नाकात गेले तर लूज मोशन होतात, असे तिच्या आईने तिला सांगितले होते. तिच्या आजोळी, केजला रीठ्याचे झाड होते, म्हणून बर्‍यापैकी रीठ्याचे उपयोग तिला माहीत होते.

रीठ्याचा उपयोग फक्त केस धुण्यासाठीच नाही, तर इतरही अनेक गोष्टींसाठी केला जातो. हे आई व आजीचे काही उपयोग सांगत आहे:
रीठा पावडरचा उपयोग नैसर्गिक डिटर्जंट म्हणून केला जातो. ती कपड्यांना स्वच्छ करते आणि त्यांचे रंगही टिकवून ठेवते. पैठणीसारख्या महागड्या साड्या रीठा पाण्यात धुतल्या जातात.शश
रीठा भांड्यावरील तेलकटपणा आणि डाग काढण्यासाठी उपयुक्त ठरतो.
रीठा पावडर त्वचेसाठी साबणासारखी वापरता येते. ती त्वचेला स्वच्छ, मऊ आणि निरोगी ठेवते, साबण न लावता.

सोनं, चांदी आणि इतर दागिन्यांवरील मळ साफ करण्यासाठी रीठ्याच्या पाण्याचा उपयोग केला जातो. हळदीमध्ये रीठा पाणी गरम करून, दागिने साफ केल्यास ते अगदी नवीन दिसतात, जणू दुकानातून आताच घेतल्यासारखे.

तुम्ही रीठ्याचे कोणते उपयोग करता, नक्की सांगा.

Suraj Kumari Goswami 
सुरजकुमारी गोस्वामी, हैद्राबाद

चिगूर

हजार रू किलो .....आहे  चिगुर।  हो! हा फोटो मधील पाला  चिगुर (Chiguru / Chiguru) म्हणजेच चिंचेचा  नवीन, कोवळी पानं , 

आंबट-तिखट 
चटणी ही चवदार 

चिगुराची चटणी अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असते. ही विशेषतः दक्षिण भारत, तेलंगणा, आणि काही आदिवासी भागांमध्ये लोकप्रिय आहे.

 चिगुर चटणीची रेसिपी (Chiguru Chutney)

साहित्य:

चिगुर (कोवळी पाने) – १ वाटी (स्वच्छ धुतलेली)

लसूण पाकळ्या – ४-५

हिरव्या मिरच्या – २-३ (चवीनुसार)

चिंच – १ लहान लिंबाएवढी (पाण्यात भिजवलेली)

मीठ – चवीनुसार

जिरे – ½ टीस्पून

तेल – १ टेबलस्पून

मोहरी – ½ टीस्पून (फोडणीसाठी)

कढीपत्ता – काही पाने (इच्छेनुसार)

🔹 कृती:

 चिगुर स्वच्छ धुऊन, निथळून ठेवा.

कढईत थोडं तेल गरम करून त्यात लसूण, हिरवी मिरची, आणि चिगुर घालून परतून घ्या – २-३ मिनिटं. गार होऊ द्या.

 आता हे सगळं आणि चिंच, मीठ, जिरे एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटा. (थोडंसं पाणी घालू शकता)

एका कढईत थोडं तेल गरम करून, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करा.
 ही फोडणी वाटलेल्या चटणीवर ओता.

तुम्ही कोथिंबीर किंवा शेंगदाण्याचं कूट घालून वेगळी चव देखील आणू शकता.

काहीजण यामध्ये थोडा गूळ देखील घालतात गोडसर चवेसाठी.

ही चटणी गरम भात, रोटी, किंवा इडली/डोसा बरोबर अप्रतिम लागते!

बनवा. खा. चिगुर   चवदार चटणी

......®© सुरजकुमारी गोस्वामी हैदराबाद

#चिगुटणी #ग्रामीणचव #टेस्टीट्रेडिशन #VillageFoodIndia #TraditionalRecipe #ChiguruChutney #DesiSwad #LocalFlavours #OrganicCooking #ForestFood #NaturalTaste #VillageKitchen #HealthyChutney #SimplicityOnPlate #देसीचव #चटणीखास #झणझणीतचव #ग्रामीणखाद्यसंस्कृती #सोपीकृती

Friday, 7 February 2025

हैदराबादी हिंदी

(हैदराबादी हिंदी):
दोन दिन के वास्ते महाराष्ट्र में आई थी, बहन के घर उदगीर में, पूरे परिवार के साथ। बहुत साल हो गए थे, किसी भी त्योहार या मौके पे मायके आना हुआ ही नहीं। इस बार संक्रांति के बाद का समय था। मस्त दहाले, बोर, वटाने वगैरा रान मेवा का मज़ा लिया। खास लेकी (बेटी) के लिए उसका फेवरेट पाक भी मंगवाया।

अम्मा को भी बहन के घर बुलवा लिया था। हम तीनों  (मायलेकी) मां-बेटियां) मिल गए तो फिर, "दूसरा जाये भाड़ में," गप्पों की महफिल चालू हो गई। मियां (पति) हमको छोड़कर घूमने निकल गए, बच्चे छोटे भाई के साथ मस्ती में बिजी थे।

हमारी बातें चलती गईं और दिन कब रात में बदल गया, पता ही नहीं चला। मियां का फोन आया, पर मायके में कौन फोन की तरफ देखता है? 10-12 मिस कॉल के बाद ध्यान आया कि फोन बज रहा है।

फोन उठाया:
मैं: "हैलो, कहां हो अजी?"
वो: "अरे, कौन सी गली में है घर?"
मैं: "सुबह तो छोड़कर गए थे हमें।"
वो: "समझ नहीं आ रहा, घर कहां है। बाहर आकर देखो।"
मैं: "बालकनी में आई, आप तो दिख नहीं रहे।"
वो: "अरेरे, जहां गली में फैशन शो चल रहा है, वहीं होगा घर। औरतें ही औरतें दिख रही हैं!"
मैं: "परेशान ना करो, कौन गली में फैशन शो रखता? देखती हूं जरा।"

गली में जाकर देखा तो सच में सजावट बड़ी जबरदस्त थी। फूल, गुब्बारे, सबकुछ। कुछ औरतें आ-जा रही थीं । 
 मैंने कहा, "तुम भी गाड़ी वहीं रोककर रैंप वॉक करते हुए आओ!"

लेकिन पास से देखा तो फैशन शो नहीं था। ये तो हळदी-कुंकू का प्रोग्राम था। औरतें कुर्सियों पे बैठी थीं, उन्हें हळदी-कुंकू लगाया जा रहा था। पर मेरे मियां को वो फैशन शो दिखा!

मन वहीं रुक गया। संक्रांति के दिन मम्मी मंदिर जाती थी। पूरे गांव में वाण की पोटली लेकर हम  उनके पिछे घुमतै थै  । मिले हुये वाण कै बैर किसके खैत कै है यह अंदाज लगातै थै ...जो सामान गिफ्ट मै मिलता था उसके लिये लढाई 
 होती कि किसको ज़्यादा मिला बोलके।

इतने में मियां बोले, "चलो पागल, तुम्हें भी फैशन शो में जाना है क्या?"
मैं हंसते हुए बोली, "इसे हळदी-कुंकू कहते हैं, जो महाराष्ट्र में संक्रांति के बाद करते हैं।"

घर वापस आए। सच में, अब ये पारंपरिक हळदी-कुंकू भी फैशन शो बन गया। ऐसा ही लगा

- .....एक महाराष्ट्र की बेटी,  Suraj Kumari Goswami हैद्राबाद
मैमरि
---