Thursday, 2 February 2017

गार्हाने

आई !! तुझ्या नावाचा महिमा वर्णावा किती भक्तांची माय तूझी कीर्ती दाहीदिशी भक्त येती तुझ्या भेटी ते जरी दूरदेशी गाव तूझे जणू भक्तांना हक्काचे माहेर तुझ्या गावात भक्तांचे असते स्वागत पण ऐक आता कहाणी तू तुझ्या गावाची आई!! चोराचा परि येथे सुळसुळाट राजरोज खिशे येथे कापतात मनमानी भक्ताची चालते लुट बांधलाय जरी मोठा भक्तनिवास एका दिवसाच्या रहायचे भाड्याचे येथे पेकेज असते हजारात.... आई!! मनसोक्त भक्तगणास लुटतात आई तुझ्या दरबारात भांड का देतेस त्यांना तू ही सुट वाटते झाकलेस डोळे बंद आई!! तुझ्या दर्शनास लागते भलीमोठी रांग जन ताटकळी येण्या तुझ्या पावलावर खाश्या मंडळींसाठी असे लगेच प्रवेश अशी ही स्पेशल दर्शन का मला सांग? भक्ती त्यांची माझ्या पेक्षा मोठी झाली हे एकदा तरी मला तू समजावून सांग आई!! तुलाच वाहिलेल्या सामानाने मांडतात बाजार भक्तांना लुटायला चालतात कसे कसे हे खेळ तुला का दिसत नाही? हा सगळा प्रकार तुझ्या गावातच होतात भक्तांचे हाल अपार नको वाटते म्हणून यायचं तुझ्या दारावर आलोतर मिळतच नाही दर्शन कधी डोळाभर आई!! ऊघड डोळे तूझे आणि कर स्वतःलाच मुक्त फोड पापाचा घडा त्या चोरांचा जो भरलाय ऐक येवढे गा-हाणे तुझ्या कष्टी लेकराचे येऊदे मला ठेवायला मस्तक थेट तुझ्या पायावर होईन ऊतराई लाभेल जीवा शांती तेव्हा माऊली माझी असेल फूकट करंटीस जेव्हा .............सुरजकुमारी गोस्वामी...हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment