Tuesday, 14 February 2017

गाव

वेदनेत आज सांज आहे हरवले माझे गाव आहे..... माझ्या आठवणीतले गाव आज मनात दडले आहे.... गाव तसे खेड्याचे होते प्रेमाचेच तीथे वारे होते गावा होता वडाचा पार गर्दी तीथे व्हायची फार लहान सहान क्रार्यक्रमाचे निश्चीत स्थान तीथे आहे. वेदनेत आज सांज आहे हरवले माझे गाव आहे..... गावकरी तशी साधी भोळी रामप्रहरी नेहमीची भुपाळी नटायचे सारे हरएक सणास पुरणपोळी नेवैद्य असे देवास खळाळत्या नदीमध्ये पोरांचा खेळण्याचा परीपाठ आसे.. वेदनेत आज सांज आहे हरवले माझे गाव आहे..... गावात त्या होती आर्दश शाळा तीथे फुलवला संस्काराचा मळा दर्ग्यात चाले नमाज पाच काळ मंदिरातून वाजे मृदंग अन् टाळ सणासणांचे नुसते ऊधाण होते अल्लाह् राम संगतीने तीथे होते वेदनेत आज सांज आहे हरवले माझे गाव आहे..... एकच किराणा, एकच चांभार एकच न्हावी; अन् एकच पार एक विहीर त्याला एकच रहाट आयाबायांना त्याचाच आधार. भांडणतंट्याला पंचाचा धाक पाटलाचा गावात वचक होता वेदनेत आज सांज आहे हरवले माझे गाव आहे..... पाराचा वड आजही तसाच आहे पण माणसं आता जमत नाहीत भांडणतंटे सुद्धा तसेच आहेत पण पंचांना आता कोणी जुमानत नाहीत एकमेकांची सुख दुःख आता नाहीत नविन वारे आज तीथे फिरून गेलेत म्हणून पारही आताशा खचला आहे वेदनेत आज सांज आहे हरवले माझे गाव आहे. .........सुरजकुमारी गोस्वामी ..हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment