Friday, 10 February 2017
विधवा
तिच्या बाबाच घर आता, तीचं राहीलं नाही
आयुष्यभर साथ देणारा नवराही
आता तिचा राहिला नाही
या माणसाच्या जंगलात तिनं
जगायचं तरीकसं
नवरा नाही हीचा म्हणून विकट हासणा-या लांडगायाच्या नरलेला
भिडायचं तरी कसं..
बाईचे आयूुष्य म्हणजे काचेच घर थोडा धका लागला तर
खळळ् आवाज करत विस्कटून जाते आणि पसरते चर्चा गावभर..
तिनेे जपायचे कसे देहाला
उमलेत्या गुलाबी जवानीला
लपवायच तरी कसं...
तिने घातली पांढरी साडी,घेतला पदर
डोईवर तरी पिसाळलेल्या नजरांना
आडवता येत नाही...
आयूष्य असं एकटीने जगायचं कसं ..
विधवेच जीवन जीव मारुन
हयातभर जगायचं कसं ...
तिने जगायचं आयुष्य आठवणीत फक्त आणि
जगासाठी तिने मारायचं स्वतालाही आतल्या आत ...
येथे तर जन्मलेल्या कळीवरही
होतात बलात्कार..
त्या वासणांध नराधमांच्या पिसाळलेल्या नजरेतून
त्या गुलाबाने किती जपायच पाकळ्यांना ....
विधवेच जीवन चंदन होऊन झिजवायच तरीं किती....
अन
दोर तुटलेल्या पतंगा सारखं आयूष्यभर
मरायच तरी किती
असंच क्षणा क्षणाला.....
****************************सुरजकुमारी गोस्वामी...हैद्राबाद
****************************
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment