Friday, 9 March 2018
Thursday, 8 March 2018
*तेव्हाच होईल सर्वच महिला दिन साज*
*तेव्हाच होईल सर्वत्र महिला दिन साजरा*
*फिरतील महिला केसात माळून गजरा ।। धृ ।।*
शुभेच्छांचा पाऊस सगळीकडून पडेल
पाहून हे सारे मात्र....
अत्याचाराने उध्वस्त झालेल्या बाळाचा
आत्मा कुठे तरी रडेल....!
घोषणाबाजी फक्त एका दिवसासाठी
का होता तुम्ही त्यास राजी...?
रोजच व्हावा येथे
महिलादिन साजरा ...!!
प्रत्येक घरात होईल मग मुलीचा
जन्म हासरा.....!!!
*तेव्हाच होईल सर्वत्र महिला दिन साजरा*
*फिरतील महिला केसात माळून गजरा ।। १ ।।*
गर्भातच मारता तिला
मग कशाला करता हा थोतांड सारा ?
रोजच झगडते ती स्वरक्षणासाठी
आहेत असुरक्षित येथें लेकीबाळी
क्षणाक्षणाला येतात
येथे बलात्काराच्या बातम्या..
काय होणार साध्य असे
दिवस करून साजरा..?
दिसेल जेव्हा मुलीचा
चेहरा फिरून लाजरा
*तेव्हाच होईल सर्वत्र महिला दिन साजरा*
*फिरतील महिला केसात माळून गजरा ।। २ ।।*
तासा तासाला मरते जळून
हुंड्यासाठी ती..
कधी मारली तर कधी
मेली जाते ती..!
फक्त भोगाचीच वस्तू
बनलीय ती..
पांढरपेशा समाजात
देवदासी ती..!!
का उगीच गाता पोवाडे
स्री मुक्तीचे..?
आहे काय धोरण
अत्याचारी नराधमाला मारण्याचे...?
बसेल जेव्हा त्यांना हादरा..
*तेव्हाच होईल सर्वत्र महिला दिन साजरा*
*फिरतील महिला केसात माळून गजरा ।। ३ ।।*
एकांती झालेल्या बलात्काराचा
भर कोर्टात लिलाव लागतो..
अब्रूची लक्तरे काढून
सगळ्यासमोर मांडावा लागतो..!
सांगा कुठल्या स्री चे आयुष्य
बदलले महिलादिनी .....?
कुठल्या कळीचा खुडण्या आधी
शील निभावलेय का कुणी ...?
जेव्हा मुलगीच बनेल
वंशाचा वारसा !!
*तेव्हाच होईल सर्वत्र महिला दिन साजरा*
*फिरतील महिला केसात माळून गजरा ।। ४ ।।*
मुलगीच वाढवते वंश हे
नाही समजत त्या नपुंसक विद्वानाला ?
आईच्याच गर्भातून निपजला
तरी माणूस का येवढा
हीन समजतो बाईला....!
आज ती कुठेही सुरक्षित नाही
दिल्ली असो वा गल्ली ....!!
जेव्हा समाज समजेल
बरोबरीने मादीला...
*तेव्हाच होईल सर्वत्र महिला दिन साजरा*
*फिरतील महिला केसात माळून गजरा ।। ५ ।।*
ती आई, बहिण, प्रेयसी, पत्नी
ह्या मुखवट्यात राहून...
होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढेल
करण्यास खात्मा ..
येथील पुरूषप्रधान संस्कृतीचा वारसा
*तेव्हाच होईल सर्वत्र महिला दिन साजरा*
*फिरतील महिला केसात माळून गजरा ।। ६ ।।*
..........सुरजकुमारी गोस्वामी ...हैद्राबाद