Monday, 5 March 2018

आनंदकंद *तोच डाव देना* हातात हात देना स्वप्नास साथ देना मज आज चांदण्याची उधळून रात देना उबदार ह्या मिठीचा विळखा असा असावा कैदेत राहणाच्या चाळा नवाच देना त्या दुरच्या दिव्यांची झाली जुनी कहाणी जिवनास अर्थ देई ती एक वात देना काळोख दाटताना बरसात आत झाली उदरात अंकुराची चाहूल आज देना श्रृंगार खेळताना मन चिंब चिंब झाले मनसोक्त खेळण्याला मज तोच डाव देना ©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7 --- Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment