Monday, 1 January 2018

प्रेम आगळे रे

हे प्रेम आगळे रे माझ्या नसात आहे तुझीच खास छाया माझ्या मनात आहे हुंकार आठवांचा हळुवार श्वास आहे बिलगून चांदण्याची बरसात होत आहे फुलते कळी प्रमाणे अलवार गात्र आहे अलगूज भावनांचा हृदयी मृदंग आहे बेधुंद आज झाले सुखनैव मुग्ध आहे भारून ह्या मनाला मी प्रेम मय आहे सांगू नकोस आता ते गोड शब्द नुसते बाहूत वेढ मजला पुरती तुझीच आहे खुलली मनात माझ्या ती पाकळी सुगंधी भ्रमरापरीस चुंबी अधरास ओढ आहे माझीच मी न उरले झरले तना मनाने हा काय डाव केला जडला विकार आहे ©सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद --- Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment