हे प्रेम आगळे रे
माझ्या नसात आहे
तुझीच खास छाया
माझ्या मनात आहे
हुंकार आठवांचा
हळुवार श्वास आहे
बिलगून चांदण्याची
बरसात होत आहे
फुलते कळी प्रमाणे
अलवार गात्र आहे
अलगूज भावनांचा
हृदयी मृदंग आहे
बेधुंद आज झाले
सुखनैव मुग्ध आहे
भारून ह्या मनाला
मी प्रेम मय आहे
सांगू नकोस आता
ते गोड शब्द नुसते
बाहूत वेढ मजला
पुरती तुझीच आहे
खुलली मनात माझ्या
ती पाकळी सुगंधी
भ्रमरापरीस चुंबी
अधरास ओढ आहे
माझीच मी न उरले
झरले तना मनाने
हा काय डाव केला
जडला विकार आहे
©सुरजकुमारी गोस्वामी
---
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment