नविन आहे
हृदयात ऊठलेला हा भाव नविन आहे.
मन मंदिरातला हा संवाद नविन आहे.
पहिलाच स्पर्श देई मज वेगळीच गोडी
वेड्या मनात आता हा भास नविन आहे
भेटायचे सख्याला मी कोणत्या किनारी
मी चालते अताशा जी वाट नविन आहे
बेभान धुंद झाले, ह्या वेगळ्या नशेने
जगण्यास घेतलेला मी ध्यास नविन आहे
श्वासास रोखले मी, त्याच्या मिठीत शिरता
गालावरी गुलाबी ही लाज नविन आहे
....सुरजकुमारी
---
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment