Friday, 26 January 2018
स्वतंत्र्य माझा देश आहे
स्वतंत्र माझा देश आहे
स्वातंत्र्यवीरांनो प्राणांर्पण
तुमचे विसरला सारा
जनसमुदाय आहे
*आणि म्हणतो आपण फक्त*
*स्वतंत्र माझा देश आहे.*१
स्वतःचे भले करण्यासाठी
येथें जो तो जगत आहे
कुठल्याही पातळीवर
जाण्यास तयार आहे
*आणि म्हणतो आपण फक्त*
*स्वतंत्र माझा देश आहे.*2
हरवून गेले येथे आपले
पालक वृद्धाश्रमात आहेत
मुलगा मात्र ऐषोआरामी
लोळतो सुखात आहे..
*आणि म्हणतो आपण फक्त*
*स्वतंत्र माझा देश आहे.*3
काल परक्याचे गुलाम होतो
आज स्वतंत्र माझा देश आहे
काल ब्रिटीशांचा होता, आज
राजकारण्यांचा लगाम आहे
*आणि म्हणतो आपण फक्त*
*स्वतंत्र माझा देश आहे*४
ज्याला त्याला स्वार्थाची लागण
भारताच्या होणा-या -हासाची
पर्वा कुणाला आहे......
देशप्रेम, जाज्वल्याच्या बाता
फक्त १५ ऑगस्टलाच होत आहे.
*आणि म्हणतो आपण फक्त*
*स्वतंत्र माझा देश आहे*५
वर्षभर अडगळीत असलेला
तिरंगा आज मानाने
उंच आभाळात डौलत आहे.
तो अडगळीतला तिरंगा खरा
की आजचा डोलणारा खरा...
हे गुढ अनाकलनीय आहे.
*आणि म्हणतो आपण फक्त*
*स्वतंत्र माझा देश आहे*६
*सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद ....*
Shared with https://goo.gl/9IgP7
---
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment