Friday, 2 February 2018

नयन

*नयन* नयनाच्या पटलावर ह्या धुके आठवांचे साचले तुझ्या प्रीतीचे रंग सारे वाटे डोळ्यातच विरले आठवणींचा तो सोहळा डोळ्यातून झरला सारा लाजणा-या रोमरोमांचा उन्माद कसा सरला सारा आतूर नयन माझे शोधी वाट तुझी कैक दिवसाची सैरभैर मनास रे माझ्या आस आहे तुझ्या प्रेमाची गुंतले मी डोळ्यात तुझ्या हरवून बसले तहानभुक बाण मदमस्त त्या नयनांचे वेध घेती हृदयाचा अचुक ........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद --- Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment