Saturday, 17 February 2018
विरह कविता
*विरह कविता*
*-------------------------------*
*💞💞विरहात*
*तुझी आठवण येते*
*तुझ्या विरहात*
मन वेडे पिसे होते
*तुझी आठवण येते*
काळजाची ही जखम
*पुन्हा ओलीचिंब होते*..
तुझा सहवास आहे
*खोल माझ्या हृदयात*
रोज स्वप्न मी पहाते
*तूला भरून डोळ्यात.*..
तुझी आठवण येता
*फुले हास्य ओठांवर*
तूझे गुणगुणता नाव
*होतो काळजात वार*.....
साथ तुझी नाही आता
*पण राहिलास स्पंदनात*
साठली आसवे वेडी
*हळूच आर्त नयनात...*
दिसता नभातला चांद
*दिसतो चेहरा तुझाच*
येशील का तू अंगणी
*चांदणी झुरली दिनरात*
तुझी आठवण येते
*मला जाळते पोळते*
वात होऊन शांत मी
*मंद मंद उजळते*...
*विरहात तुझ्या*
नयनास माझ्या कधी
*तूझी आठवण येते*
कधी सुखावून कधी
*दुःख होऊन वाहते..*
*-------------------------------*
*सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
---
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment