Saturday, 17 February 2018
राजे जन्माया
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
*राजे जन्माला या*
*राजे!! जन्माला या;*🗡🗡
आज गरज आहे तुमची या रयतेला. !!धृ!!
जीथे जन्माला होता काल मावळा
तिथे राजकारणी कावळ्याचा सुळसुळाट झाला
आज माणुस स्वार्थी झाला.....
*राजे!! जन्माला या;*🗡🗡
आज गरज आहे तुमची या रयतेला.....१.
येथे जातीच्या नावावरून
होतात दंगली
घडवतात धर्माच्या नावाने युध्द
जोतो माणुसकीची शिकवण विसरला
*राजे!! जन्माला या;*🗡🗡
आज गरज आहे तुमची या रयतेला....२.
ह्या राष्ट्रांत माणुसकी राहिली नाही
आईबहिणीवरची अत्याचार थांबली नाही
जी नष्ट होते गर्भातच ती
तीचे अधीकार समाज आहे विसरला
*राजे!! जन्माला या;*🗡🗡
आज गरज आहे तुमची या रयतेला...३.
येथे जरूरीचे आहे
तुमच्या बाण्याची सह्याद्रीच्या राण्याची
स्वराज्याची मशाल नव्यानं पेटवायला येथे गरज आहे आजच्या तरूण पिढीला
*राजे!! जन्माला या;*🗡🗡
आज गरज आहे तुमची या रयतेला....४.
येथे जाती धर्माचा कायदा
तुम्हास मोडीत काढायचा आहे
मुठभर मावळ्याच्या मदतीने का होइना
पण संस्कारमय राष्ट्र घडवायचा आहे
*राजे!! जन्माला या;*🗡🗡
आज गरज आहे तुमची या रयतेला...५.
आई भवानीचा आशिर्वाद देण्यासाठी
आई अंबेचा आदर संस्कार करण्यासाठी
खुप काही करावे लागेल राजे तुम्हाला
पुन्हा समाज सुधारण्यासाठी..
*राजे!! जन्माला या;*🗡🗡
आज गरज आहे तुमची या रयतेला..६.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
©®*सुरजकुमारी* गोस्वामी हैद्राबाद*
---
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment