Friday, 10 March 2017
नारी तू नसे अबला
नारी तू नसे अबला
नारी तू नसे अबला
ध्यान्यात तुझ्या असू दे
तूच रणरागीणी हो
मर्दानी तू सबला हो
नको पाहू अत्याचार
तुम्ही उघड्या डोळ्यांनी
हो तलवार चीरण्या
दुष्टाला मर्दानीवाणी
बुरख्यात अडकून
बेडीत गुरफटून
जाऊ नकोस कधी
दे लढून तू ओळख
रोज तुझ्यावर येथे
नजरांचे बलात्कार
तेथेच फोड डोळे तू
रक्षिण्या बन तू घार
चुल आणि मुल आता
नाही तुझे हे अस्तित्व
घे भरारी पंखात या
भर बळ मनसोक्त
नारी तू नसे अबला
सिध्द तुच आता केले
बंद ज्वालामुखीचे ह्या
उद्रेक झाले पाहीले
............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment