Friday, 10 March 2017

पत्र

नमस्कार !! कशी आहेस? काय लिहू तुला मी? खरं तर तू माझ्यातच राहतेस आणि मी तुझ्यात. माझ्या मनातलं गुपीत तुझ्यात दडलेय तर कधी तुझ्या हृदयाचा ठाव मी घेतलाय. तू माझी अन् मी तुझी! सांग बरं कुठून सुरवात करू तुझ्याशी संवाद साधायला? तू तर माझी सावली आहेस नाही का? फक्त मी मोठी आणि तू ईवलीशी. तुला आठवते? लहानपणीच्या गमतीजमती. अरे !! पण तुला काय सांगतेय मी? तू तर मीच आहे 😃 मला आठवतयं ! मला देवी आल्या होता, खुप खाज सुटली होती अंगाला. आई तर ओरडत होती नुसती खाजवू नकोस म्हणून पण तू मला सारखेच सांगत होतीस खाजवं, गुदगुल्या करत होतीस, मला खीजवत होतीस खाजव संगळे शरीर म्हणून आणि मी तुझेच सारे ऐकत होते, शेवटी आई चिडली आणि म्हणाली तुला माझे ऐकायचे नाहीय तर ठीक. असे म्हणून तीने दोन दिवस माझे हातपाय पलंगाला बांधून ठेवले होते. खरं सांगू का? तुला मी तुला खुप शीव्या घातल्या होत्या. तुझी कामे प्रत्येक वेळेस अशीच, खोडसाळ!! खुपच खोडकर होतीस बाई तू. आग रागवलीस..! रागवु नकोस ना प्लीज ..!! हस बरे प्लीज वरून आठवले पाचवी पासून इंग्रजी हा विषय शिकायला होता तेव्हा, आठवते का तुला A फाँर ऐपल, B फाँर बाँल असे शब्द पाचवीत शिकत असताना शीकायचे. आवडायचं मला. तू नेहमीच हिंमत द्यातचीस, येईल तुला, कर प्रयत्न सांगत रहायचीस. मी मात्र; खचून जायचे बरं का! तरीसुद्धा तु नेहमीच मला प्रोत्साहन द्यांतचीस आणि सारेच काही महिन्यात मी शिकले होते ते तुझ्याच प्रोत्साहनामुळे. एके दिवशी खुप जोरात पाऊस पडला होता वर्ग ओला झाल्यामुळे सहावीच्या वर्गात बसवण्यात आले होते. आठवते का तुला? दोन्ही वर्गातील मुलानी नुसताच गोंधळ लावला होता. गुरूजी ही चिडले आणि इंग्रजीचे शब्द विचारायला सुरवात केली. कुठलाही शब्द विचारत होते ते, सहावी, पाचवीचे मुलं एकत्र होती, हे जणू ते विसरलेच होते. सर छडी घेऊन सगळ्यानच मारत होते, माझ्या पाशी आल्यावर मला शब्द विचारण्यात आला. Mix (मिक्स) म्हणूजे काय? मी बरोबर उत्तर देऊनही मला मारले गेले. मी गप्पच होते पण तू मला गप्प बसू देत नव्हतीस. मी रडत होते तू मला हिंमत देत होतीस. जा! गुरूजींकडे आणि सांग तो पाचवीचा शब्द नाही म्हणून. मी ही बाजूला बसलेल्या शितलचे पुस्तक हिंमतीने घेऊन गुरूजींकडे गेले आणि म्हणाले हा सहाविच्या पुस्तकातील शंब्द आहे, आणि तुम्ही मला विचारला, मी उत्तर देऊनहि तुम्ही मला का मारले? सरांनी मान खाली घातली होती सांगितले होते, "मागच्या दोन दिवस झाले तो शब्द मी विचारत आहे वर्गात कुणीही उत्तर देत नाही म्हणून मी चिडलो होतो. पण तू पाचवीच्या वर्गातील का ?" मी हो म्हणाले तेव्हा मला परत सहावीच्या वर्गात नेहून तोच शब्द विचारण्यात आला होता, कुणालाही उत्तर नव्हते आले आठवले का तुला. परत सगळ्या वर्गात झालेल्या तुझा माझा सत्कार. मज्जाच आली होती, पण तू दिलेल्या हिंमती मुळे बरं का. खुप जुने खुराळ गाळत बसले मी तुझ्याशी बोलताना. खुप सगळे काही सुटले ते हातातून. तुलाही माहिती आहेच सारे बालपण, तरूणपण, आता ही सगळे आठवणीत आहे. सगळं मागून मिळते असे नाहीये ना? लग्न, मुलबाळ, संसार जो परका त्याला आपले म्हणने. खुप काही बदलले आहे आता. कधीकधी वाटते सोडून जावे हे संगळे कुठेतरी. फिरायला मोकळेपणाने, एकटिने तुझ्या सोबतीने. तुझ्याशीही सवांद आता जास्त होत नाही. यांची खंत वाटते मला कधी पेपर हातात घेऊन वाचायला वेळ मीळत नाही, पण आता वाचावेही वाटत नाही बघ. रोज समाजात होणार बलात्कार, हुंडाबळी ह्यान्नी मन हेलावून जाते. सगळं वाचून. आज वाटले मनसोक्त बोलाव तुझ्याशी खूप दिवस झालेत. तुही आताशी हिंमत देत नाहीस. कधी आता मला पुर्वीसारखी रूसली आहेस का? असे विचारत नाहीस. मी सुद्धा तुला वेळ नाही देऊ शकत मी. तुझ्या सुचनांचे तंतोतंत पालन करते मी. मी स्वतःसाठी वेळ देतेय नवर्याच्या खिशाचीळ झळ देतेय स्वतः ला. भरयं.. चल थांबवते पत्र! पण तू येत जा अधूनमधून. मला धीर द्यायला. खुप गोष्टी सांगायच्या होत्या, पण जुन्या आठवणीने मुळे खुप मोठं झाले पत्र. मनमोकळेपणाने बोलले खुप दिवसांनी तुझ्याशी, स्वतःशीच. ...........मी तुझी तु माझी सखी भेटत जावू आशाच एकमेकीशी ..तुझी आणि फक्त...... तुझीच मी डियर.. ..........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment