रंगात दंग होऊ नको
गुलाल तू उधळू नको
राधीका जरी मी तरी
कान्हा मला छेडू नको
गोपी रंग खेळी तिथे
तू मात्र तेथे रंगू नको
रंगात रंगू दे मला जरा
रे तुझा हा चाळा नको
घे हातात हात माझे
गाली उमटले रंग तुझे
गवळणी जरी आल्या तरी
खेळणे तू तुझे सोडु नको
खुप झाले बहाणे तुझे
मला असे छेडण्याचे
रंगवून रंगात तूझ्या रे
असा मला जखडु नको
...........सुरजकुमारी
No comments:
Post a Comment