का पोसतोय जाती माणूस फोल आहे
त्या वेदनेस पाळी हृदयात खोल आहे
त्याची वरात तेथे निघते भकास आहे
माझ्या मढ्यास सुद्धा दमडीत मोल आहे
विश्वास ठेवण्याचा नव्हता कयास माझा
योगी महंत ह्यांची दुनियाच गोल आहे
सुरवात आणि शेवट ह्याच्यात वाद होता
मधल्यात मजकुरांचे नुसतेच बोल आहे.
सुर्यास मी विचारी तू कोणत्या दिशेचा
स्वयं प्रकाश वदला मी तर खगोल आहे
...,, सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment