Tuesday, 26 December 2017

*आयुष्य !!* वेणू गोपाल नावाला साजेल असा कृष्णा सारखा सावळा घरातील प्रेत्यकाचा लाडका. वहिनी दोन भाऊ आई बाबा साठी. तसा तो व्रात्य, यानं त्या कारणाने तो सतत लोकांच्या नजरेत भरणारा कधी गणेश स्थापन, तर कधी दुर्गा पुजेत गाणे गाऊन सगळ्याना आपल्या प्रेमात पाडणारा. प्रसंगी कोणाशीही नडाणारा. 21वर्षे वयाचा तरूण. शिक्षण तसे जेमतेम दहावी पास. भाभीचा लाडका देवर तो. वेळोवेळी वहिनीची मदत करणारा वहिनीसाठी आईशी लढाई करणारा. वहिनीला रांगोळी काढून दाखवून त्यात सप्तरंग भरून देणारा. वहिनीला विरंगुळा होता वेणू. लग्नाच्या सात वर्षे झाली तरी वहिनीला मुलबाळ नव्हते. ती वेणूला मुलाप्रमाने साभाळत असे. हसरा सावळा असा; वेगवेगळ्या लोकात आपली छाप सोडणारा, तसेच मित्रांसाठी जीव की प्राण. त्याचे वय वाढत होते तसा वेणूचा अल्लड पणा जास्तच वाढत चालला होता, आई बाबांनी समजावूनही तो काही कामधंदा करत नव्हता की मनावरही घेत नव्हता. मित्राच्या घरी येणेजाणे रात्र-रात्रभर बाहेर रहाणे. असेच त्याचे दिवस चालले होते. वहिनीने एके दिवशी समजावून सांगितले; वेणू तू लहान नाहीस आता काही तरी कामधंदा कर, पैसे नसतील तर मला सांग मी देईन. वेणू गालात हसायचा. (मनात विचार करायचा जी स्वतःच कंगाल ती मला काय देणार?) तरीही वहिनीने दिरासाठी गळ्यातील सोन्याची चेन काढून दिली वेणू चे डोळे भरून आले. वहिनीने कुणालाही न् सांगण्याच्या अटीवर चेन दिली. वेणूने किराणा दुकान टाकले आई बाबांनी पैसे कुठून आणले म्हणून विचारले तरी त्याने तोंड उगडले नाही. जवळच्या नात्यात लग्नसमारभाला जाताना सासुबाईंनी सुनेला चेन मागितली; सुनबाईनेही हुडकण्याचे नाटक केले. पण सापडलीच नाही, जे नव्हते ते सापडणार कसे? सासूबाईने सुनबाईला धारेवर धरले निपुत्रीक म्हणून हिणवू लागल्या. ईकडे वेणूचे दुकान मित्रांसाठी फुकटचा अड्डा झाला होता वयही वाढले होते. वेणूचे आता मित्राच्या बहिणीवर प्रेम जडले होते. हळूहळू याची चर्चा गावभर होऊ लागली तशी त्या मित्राच्याही ध्यानात हे आले. मित्राने जराही वेळ न घालवता बहिणीचे दुसरीकडे लग्न लावून दिले. वेणू आता आयुष्यला हरला होता. आईबाबांनीही लग्नाचा तगादा लावला होता. ईकडे वेणूला प्रेयसीची खुप आठवण येत होती, त्याने तीला जावून भेटायचा विचार केला आणि तो मित्र बनुन भेटायला गेला. तिला भेटल्यावर, तिच्याच आग्रहावर तीला विसरेन अशी शप्पथ तो तिला देऊन परत आला. या भेटीची चाहुल तीच्या भावाला तसेच तिच्या सासरच्या मंडळींना लागली. त्यांनी सुद्धा शाहनीशा न करता तीला छळायला लागले. त्याने मित्राच्या मनात बदल्याची भावना आली आणि तो संधीची वाट पाहे लागला. वेणू आता दुकानात लक्ष देत होता सर्व काही सुरळीत चालु होते. वहिनीच्या आग्रहाने वेणूने लग्नाचा निर्णय घेतला. सगळे आंनदात होते मित्रानेही वेणूला लग्नाची आंनदात मेजवानी दिली. पार्टीमध्ये नशा पाजली त्या नशेत असतानाच वेणूला मित्राने नशेचे इंटक्शन टोचले. वेणूला पण ही नविन प्नरकारची नशा हवीहवीशी वाटली. सगळेच नशेत आणि ऊत्साहात. लग्न झाले... वहिनेचे नाव सावित्री आणि वेणूच्या बायकोचे नाव गायत्री. घरात आंनदी वातावरण होते. वेणूही आता सुधारला होता. सर्व व्यवस्थित चालु होते, त्यातच वेणू बाप होणार ही बातमी आली. तशीच दुसरी आंनदाची गोष्ट म्हणजे वहिनीलाही दिवस गेले होते. आंनदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे असे घरात भाव होते. घर आंनदाने नाचत होते, सावित्री गायत्री ... रेग्युलर चेकपला डाँक्टर कडे जात होत्या. चौथा महिना सुरू झाला हौता डाँक्टरांनी रक्ताची तपासणी करावयास सांगितले. दोघींनीही तपासणी केली. रिपोर्ट आले डाँक्टरने अभिनंदन केले. सावित्री वहिनीचा रिपोर्ट पाहिला पुर्ण पण गायत्रीचा रिपोर्ट खाली पडल्यामुळे डाँक्टर तो विसरले, पाहिलाच नाही. दिवस जात होते, नऊ महिने लागले. दोघीही आपल्या आपल्या माहेरी गेल्या. वेणूचा जीव आता टांगणीला लागला होता. कोणाला काय होणार या विचाराने. गायत्रीला कळा यायला सुरूवात झाली. माहेरी डाँक्टरकडे नेण्यात आले. जुनी रिपोर्ट डाँक्टरांनी पाहिले त्यात डाँक्टरला लक्षात आले कि गायत्री. एच. आय. व्ही. बाधीत आहे. ते त्यानी दाखवताच गायत्री कोसळून गेली जणू जीवनच संपले तीचे. वेणूला आता फसवणूकीच्या आरोपाखाली अटक झाली. जेल मध्ये टाकले त्याला. सावित्री वहिनीने गोंडस मुलीला जन्म दिला, तीने गायत्रीला काय झाले ह्याची विचारणा केली. जेव्हा तीला सत्य सांगितले गेले तेव्हा तीने वेणूला भेटायचा निर्णय घेतला. जेलमधे जाऊन वेणूची टेस्ट केली. तोही एच. आय. व्ही ने बाधीत झाला होता. वेणू जेल मधून परत आला. तब्बेत घसरली होती वारंवार तो आजारी पडू लागला. विचारांची रांगोळी स्वतःभोवती तो काढू लागला. आनंद, सुखाने पाठ फिरवली. वहिनी जपत होत्या पोटच्या पोराप्रमाणे प्रेमाने. मित्रांनीही साथ सोडली होती. वेणू ग्रस्त होता. न केलेल्या चुकिचे कारण शोधत होता. आई बाबा थकले होते जीवनातून. मुलाचे हाल पहावत नव्हते. सुन गेली होती. लोकांच्या नजरेत वेणू बरोबर त्याचा परीवारालाही एच. आय. व्ही. लागला होता. वेणू आता उद्यापरवाचा पाहुणा होता, मित्रांची भेटायला रांग लागली होती. पण प्रदर्शनी ठेवलेल्या हि-या प्रमाणे ते फक्त दुरून पाहत होते. त्यातील एक मित्र प्रेयसीचा भाऊही होता. त्याची आणि वेणूची नजरानजर झाली त्याने नजर चोरली. त्याचा बदला पुर्ण झाला होता, वेणू मरणासन्न होता आणि तो मनात हसत होता, बदला पुर्ण झाला होता. काँडिक्स मधून बेहोस करून वेनुला एच. आय. व्ही. ईजन्सन देऊन बाधीत केले होते. वहिनीने हे हेरले. पण त्याने कुणालाही नाही सागण्याचे वचन वहिनी कडून घेतले. एक शपथ आज त्या गुन्हेगाराला मोकळे सोडत होती. वहिनी रडत होत्या वेणूने जवळ बोलवले आणि मोडक्याशब्दात वेणू म्हणाला मी तुझी शपथ नाही मोडली नाही तू माझी मोडू नकोस. वेणूचा हात वहिनीच्या हातातुन सुटला. वेणू प्राणास मुकला. वहिनी मुकी झाली त्या क्षणापासुन आज तागागत ती बोलली नाही. पण मित्र मोकाट फिरत आहे मी बदला घेतला म्हणून. वहिनी मुकीच; आजही शपथ देऊन गेल्या दिराला आठवून, सगळे माहिती असूनही मुकी. तीनेच दिलेल्या चेनच्या विळख्यात. ..सुरजकुमारी गौरीशंकर गोस्वामी हैद्राबाद --- Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment