तू दिलेला गुलाब सुकलाय अता
पण काटा हृदयात उरलाय अता
होरपळलेल्या स्वप्नांचे व्रण राहिले
घायाळ धूर राखेचा करतेय अता
जुन्या वस्तीतल्या जुन्या वळणावर
हरवल्या गीतांचे सूर आळवतेय अता
भग्न झालेल्या ह्या भव्य महालातून
तुझ्या पैजणांचा पायरव शोधतेय अता
वाटते किती धावायचे मृगजळा मागे
तू दिलेला गुलाबास विसरतेय अता
सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
---
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment