Tuesday, 19 December 2017

हरायचे का?

स्वप्नात फक्त आता इमले रचायचे का? त्यालाच आठवूनी आम्ही जगायचे का? केलाय यज्ञ आम्ही सौख्यास प्राप्त करण्या समिधा सवेच आता हवनी जळायचे का? धमन्यांत जिद्द आहे युद्धास जिंकण्याचे मित्रास पाहता मी समरा हरायचे का? बघ सोडला किनारा मी आज ओळखीचा घाबरुन वादळाला मागे फिरायचे का? हसण्यात गम्य नाही अश्रूंत ओल नाही खोटेच हे मुखवटे बघुनी हसायचे का? ...........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment