Tuesday, 19 December 2017

विरह कविता

*विरह कविता* *-------------------------------* *💞💞विरहात* *तुझी आठवण येते* 💞💞 *तुझ्या विरहात* मन वेडे पिसे होते *तुझी आठवण येते* काळजाची ही जखम *पुन्हा ओलीचिंब होते*..💕 तुझा सहवास आहे *खोल माझ्या हृदयात* रोज स्वप्न मी पहाते *तूला भरून डोळ्यात.*..💕 तुझी आठवण येता *फुले हास्य ओठांवर* तूझे गुणगुणता नाव *होतो काळजात वार*.....💕 साथ तुझी नाही आता *पण राहिलास स्पंदनात* साठली आसवे वेडी *हळूच आर्त नयनात...*💕 दिसता नभातला चांद *दिसतो चेहरा तुझाच* येशील का तू अंगणी *चांदणी झुरली दिनरात*💕 तुझी आठवण येते *मला जाळते पोळते* वात होऊन शांत मी *मंद मंद उजळते*...💕 *विरहात तुझ्या* नयनास माझ्या कधी *तूझी आठवण येते* कधी सुखावून कधी *दुःख होऊन वाहते..* 💕 *-------------------------------* *सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment