Tuesday, 4 April 2017
गगन भरारी
लावून मनाला पंख तू
स्वप्नांना तुझ्या दे उभारी
पंख मनाला लावून
घे उंच गगन भरारी
अडचणीवर मात करून
वादळाना पायदळी तुडवून
उत्तूग शिखर
यशाचे गाठायला
पंखात बळभर अन्
घे गगनभरारी
उंच आकाशी उडायची
पडशील तू
खचशील तू
शिकार ही होशील तू
पंख तुटतील
जाळ्यात फसशील
तरी वेठ जिद्द
उडण्याची
पंख पसरून
पुन्हा नव्याने
पेटून उठ
लाव स्वप्नांचे पंख
अन् घे गगनभरारी
आकाशी उडायला..
जिंकण्याच्या स्वप्नांविणा
जगण्यास अर्थ नाही
जिंकायचे स्वप्नं
पहा तू आणि
घे उंच भरारी
घे स्वप्न मनात
जाऊन भीडायचे
पहा स्वप्नं
आकाश कवेत घ्यावयाची
असू दे यशाची उभारी
घे गगन भरारी
उंच उडून आकाशी
रंग भर जीवनात
घे गगन भरारी
घे गगन भरारी
..........सुरजकुमारी
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment