Saturday, 1 April 2017

देव दगडाचा

दगडाच्या देवावर ओततात दुध , दही तुप,माणसाला दिसत नाही येथे माणसातील देवाचे रूप .....! दगडाच्या देवावर फुलांचे हार रस्त्यावर मरतात येथे थंडी ने कडकडुन हजार...! दगडाच्या देवावर कपड्यांच्या राशी , कसे कळनार कुणाला , उपाशी येथे हजारो भारत वाशी......! दगडाच्या देवाला आजही पक्कवान, नाही मेलेल्या मांणसाला पुरायला येथे रान ....! दगडाच्या देवालाआहे सोन्याचं मंदिर, आजही आर्धा भारत राहतो फुट पातवर. .....! दगडाच्या देवाला येथे पुजतात लोक , माणसालाचं माणसे येथे,स्वार्थ साठी कापतात रोज ....! देविच्या नावाने हे, नवराञ करतात करुन त्याच देविवर आत्याचार , पोटातच तीला नष्ट करतात ....! दगडाच्या देवावर विश्वास कीती स्वार्थासाठी केलेला उपवास किती .....! ............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment