Tuesday, 4 April 2017
आठवण्यासाठी
जे पाहिले ते विसरावे आठवण्यासाठी
दुःख झाले ते दडवावे हासवण्यासाठी
मनी उगीच तगमग का जगण्याची आज
पुन्हा आस का लागली तुला भेटण्यासाठी
असेल का काही ह्या हदयापलिकडले
जे वापरावे असे दूवार प्रेम करण्यासाठी
केले होते कधी प्रेम मीही जीवापाड
तुझ्यावरचा अधिकार माझा सांगण्यासाठी
विसरलास जरी तू मला स्वप्नं समजुन
सोडल्यास कैक वेदना मला जगण्यासाठी
कुडकुडतेय मी आज ह्या बोच-या थंडीत
तुझ्याकडे मात्र माझी पत्रे जाळण्यासाठी
बोचला जरी वारा अंगास माझ्या गारगार
झुळुक मीच होईन तुला हर्षित पाहण्यासाठी
............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment