Tuesday, 4 April 2017

पंख लावून मनाला

लावून मनाला पंख तू स्वप्नांना तुझ्या दे उभारी पंख मनाला लावून घे उंच गगन भरारी अडचणीवर मात करून वादळाना पायदळी तुडवून उत्तूग शिखर यशाचे गाठायला पंखात बळभर अन् घे गगनभरारी उंच आकाशी उडायची पडशील तू खचशील तू शिकार ही होशील तू पंख तुटतील जाळ्यात फसशील तरी वेठ जिद्द उडण्याची पंख पसरून पुन्हा नव्याने पेटून उठ लाव स्वप्नांचे पंख अन् घे गगनभरारी आकाशी उडायला.. जिंकण्याच्या स्वप्नांविणा जगण्यास अर्थ नाही जिंकायचे स्वप्नं पहा तू आणि घे उंच भरारी घे स्वप्न मनात जाऊन भीडायचे पहा स्वप्नं आकाश कवेत घ्यावयाची असू दे यशाची उभारी घे गगन भरारी उंच उडून आकाशी रंग भर जीवनात घे गगन भरारी घे गगन भरारी ..........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment