Tuesday, 4 April 2017

घर धनी माझा

*दिलाचा राजा घरधनी माझा* कारण तो माझ्या जगण्याचा कुंकू तो माझ्या सौभाग्याचा श्वास तो माझ्या अभिमानाचा घरासाठी लेकराबाळां साठी रात्रंदिवस काबाडकष्ट करतो स्वप्नं भागवण्या साठी जगतो संन्मान तो स्वाभिमान माझा *दिलाचा राजा घरधनी माझा* धनवंती मी त्याच्या डोरल्याची रूक्मिणी मी त्याचा कुंकूवाची जोड ती जोड्यव्यात मोत्यांची अर्धागिनी मी तो नरेश्वर माझा *दिलाचा दिलबर घरधनी माझा* नटतेसजते त्याची मी साजणी प्राण अर्पिले मी त्याच्या चरणी त्याची व माझी एकच कहाणी लाखात एक हा दिलबर माझा *दिलाचा दिलबर घरधनी माझा* साथ तुझी मिळुदे जन्मोजन्मी सातजन्मी लाभो तुच घरधनी भेटला देव तर मागीन वरदान कर स्विकार कन्यादान माझा *दिलाचा राजा घरधनी माझा* .....,, सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment