Friday, 16 December 2016

काजळ

कधी कुणाच्या मनामध्ये []काजळ][ मी ही वसले होते...! तू सुंदर आहेस म्हनल्यावर त्या साठी मी नटले होते...!! साजशृंगार केला मी फक्त काजळ लावले नव्हते...! बाकि काही नव्हती कमी त्याच्या माझ्या नात्यामधे...!! कसे कुणास ठाऊक माझे काजळ न लावणेच हेरले....! तू ती नाहीस म्हनुनी त्याने हृदयातुन अव्हेरले...!! मीच माझ्या नात्याला का दृष्ट लावुण घेतली...! काजळलेली रात्र माझ्या काळजात रूतली ..!! काजळ लेते रोज त्या साठी पण तो दिसत नाही शृगारलेला देह माझा कधीच हसत नाही पाहते मी आरशात जेंव्हा डोळे दिसती भिजलेले काजळाच्या आड माझे आभाळ असते थिजलेले..!! ---सुरजकुमारी... Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment