Friday, 23 December 2016
हुंडा
-------------------हुंडा --------------
कुठे पुरतो तो
जन्मभर हुंडा
का मग पोरीच्या
आईबाला गंडा
आई बाप तुम्ही
पोराला पोसता
त्या मोबदल्यात
पोराला वीकता
जन्मभराची ती
जीवन संगीनी
पैशाने मापता
पोरा भेडवून
गप्प का करता
त्या साठीच का
जन्म देता तुम्ही
हुंड्यासाठीच का
मुलींचे मायबा
तुम्ही का करतात
हुंडा देऊनच
लालच देतात
लाखपती आम्ही
म्हणून मीरवता
हुंडाच देऊनी
तो घातकरता
पोरी हुंडा देऊ
सुखाची आस
म्हणूनच सारा
तोच अट्टाहास
करतात सारा
विकता पोरीला
भिकाऱ्याला तुम्ही
सुखात राहायला
सारा हा प्रपंच
मांडतात तुम्ही
सुखासाठी हुंडा
देतात का तुम्ही
अंत आता नाही
का या हुंड्याचा
देवानं घेवानं
करता हुंड्याचा
जाते ती बळी
त्या हुंड्याची
बंद करा आता
ही प्रथा हुंड्याची
करा सुरूवात
स्व:ता पासून
तुम्ही युवकांनो
राहावं सुखानं
बंद करा प्रथा
नको आसा अंत
मुली हुंड्यापाई
करा आता शांत
...........,,सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद[कळंब
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment