Friday, 16 December 2016
नवयुवक
नवयुवक.....
नवयुवका भारत भु ची
शान तु अभिमान तु
उसळत्या रुधीरा तुन
तुझ्या घडावा उद्याचा
भारत,कर अभिषेक तु
काळजातील ज्वालेचा
या भारत भु ची
शान तु अभिमान तु
खेडी ओस पडलीय
धाव घेतली शहरी तु
आता आठव तु बापूंना
वळ पुन्हा खेड्या कडे तु
भारत भु ची शान तु
अभिमान तु
सुंदर देशाची आज झाली
दैना वाढत्या जनसंख्येने
घाल त्यास आळा आता
तुच स्वेच्छेने .....
भारत भु ची शान तु
अभिमान तु
फक्त तु माणूसकी जान
जात पात पाहू नको
माणूस म्हणून माणसाकडे
बघ फक्त गप्पा नको
भारत भु ची शान तु
अभिमान तु
विसरू नको कधी
घडवायच आहे तुलाच
पुन्हा एकदा शिवबा चे
स्वराज्य वाढवायचे तुलाच
भारत भु ची शान तु
अभिमान तु
आया बहिनीं वरचे
अत्याचार तुलाच
थांबवायचे आहेत
लामणदिवाच नाही तर
दीपस्तंभ व्हायचे आहे तुलाच
दीपस्तंभ व्हायचे आहे तुलाच
----------सुरजकुमारी--------------
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment