Friday, 23 December 2016
मन
-------------------*मन*------------
मन कसे मन
वेडे पीसे मन
मन बदलते
क्षण क्षण
क्षणभर नसते
हे थाऱ्यावर मन
कधी धरणीवर तर
कधी आकाशाला
गवसणी घालते मन
उघड्या डोळ्यांनी
स्वप्नं पाहाते वेडे मन
कधी पाखरु होऊन
उडते मन
क्षणात स्वतः शी लडते मन
मन मन मन खरच वेडे मन
आत्याचारा विरूध्द लढते
वेडे मन
बलात्काराची बातमी
ऐकून रडते ढसढसुन मन
शेतकरी बापाला हाताश
पाहुन फासवर चढते मन
मन मन मन
वेडे मन
हासते मन रडते मन
एक मनाचे लाख तराने
किती स्वप्ने पाहिले मनाने
किती सत्यात उतरीवली
मनाने मन
मनावर ना कुणाचा ताबा
देवाने दिले वरदान
एक मानसाला मन
उडते पाखरा सारखे मन
...........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद [कळंब]
[9573301003]
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment